
हळदी कुंकू
पौषात आली संक्रांत
हिवाळी थंडी अंगी
आपुलकी जिव्हाळा
जपावी अनमोल नातं
हळदी कुंकूचा विडा
सदा मान सौभाग्याचा
संक्रांत सण साजरा करा
आनंदाचा अन् नववर्षाचा
साड्या काळ्या नेसून
वेणीत माळून गजरा
घरोघरी सजे नारी
मग खिळती नजरा
माता भगिनी घरोघरी
हळदी कुंकू लावून
वाण देण्या घेण्यास
दृढ करी ऋणानुबंधन
भारतीय संस्कृती आहे
पारंपरिक सुसंस्कृतीकता
तिळगुळ घ्या गोड बोला
आणि जपा आमची संस्कृती
कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर
====