
पाठमोरी ती
कशी पाठमोरी
उभी ती राहिली
लांबूनच तिची
झलक पाहिली ||१||
नार अनभिज्ञ
शांत राहू कसा
प्रेमरोगाचा मी
घेतलेला वसा ||२||
भावते मनाला
तीच स्वप्नपरी
माझ्यासाठी जणू
अवतरे खरी ||३||
उमटले मनी
प्रेमानेच भाव
कटाक्ष तियेचा
हृदयाचा ठाव ||४||
पाहताच रूप
पडलो प्रेमात
तिचा प्रेमवेडा
जाहलो क्षणात ||५||
विनायक कृष्णराव पाटील, बेळगाव