
लातुरात रंगले बाल साहित्य संमेलन
प्रा.कल्याण राऊत,प्रतिनिधी
लातूर: अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था लातूर शाखा आणि बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन दि २४ जानेवारी रोजी भरविण्यात आले.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.प्रकाश घादगिने,उद्घाटक राजन लाखे अभामबालकुमार सा.संस्था पुणे शाखा अधयक्ष, कालिदास शेळके सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
सत्कार मुर्ती सौ.वृषाली पाटील साने गुरूजी बाल साहित्य राज्यसरकार पुरस्कार मिळाल्याने आणि दुस-या सत्कार मुर्ती सौ.उमा व्यास राज्यपाल नियक्त स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ स्विकृत सभासद सिनेट यांना गौरविण्यात आले.
अभा मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा लातूर अध्यक्ष रमेश चिल्ले यांचे प्रास्ताविकपर भाषण झाले. संमेलनाचे अध्यक्ष व उद्घाटक यांची भाषणे झाली. त्यानंतर कथाकथना मध्ये सर्वश्री जी.जी.कांबळे,दिलिप गरूड,शैलजा कारंडे,कथाकथन केले. दुस-या सत्रात भारत सातपुते जेष्ठ कवी यांचे अध्यक्षतेखाली कवी बाल कवितांचे कवीसंमेलन पार पडले. त्यातील सहभागी कवी रमेश चिल्ले,नागनाथ कलवले,प्रा.कल्याण राऊत,वृषाली पाटील,उषा भोसले,दत्तप्रसाद झंवर,गोविंद गारकर,प्रा.सुलक्षणा सोनवणे,रमेश हणमंते, राजकुमार दाभाडे प्रसिध्दी प्रमुख, निलिमा देशमुख यांनी सुत्र-संचालन केले आभार प्रदर्शन नागनाथ कलवले यांनी करीन पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.