‘तू ‘येतो’ म्हणाला होतास ना..?’; स्वाती मराडे

‘तू ‘येतो’ म्हणाला होतास ना..?’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भिरभिरू लागली नयनपाखरे
पापणकाठ ओलावला..
भास आभासी स्वप्नांच्या दुनियेत
सांग कुठे शोधू तुला…!

मावळला दिनमणी, आली कातरवेळ..आठवांनी तुझ्या सखया, पुन्हा मांडला छळ.. तू श्वासात आहेस.. भासात आहेस.. स्वप्नात आहेस.. नेत्रात आहेस.. हृदयात आहेस.. नव्हे नव्हे तू माझ्या रोमरोमांत आहेस.. तरीही डोळे वाट पाहतात.. तू येशील, मला भेटशील.. भासात नव्हे, स्वप्नात नव्हे.. प्रत्यक्षात येशील.. मला तुझ्या खांद्यावर विसावून जायचंय.. हातात हात घालून नजरेत हरवून पहायचंय.. माझं मला न उरायचंय.. तू अन् मी हे वेगळेपण नकोच आता..सांग कसे सावरू मनाला सांग कसे आवरू.. धाव घेई असे मन हे.. दौडत जाई वारू.. गजरा माळला तोही सुकला, हिरमुसला शृंगार.. थरथरते मी बावरते मी, हा यौवनाचा भार.. एकच आस जिवा लागली.. होऊन राहीन तुझी सावली.. पण त्यासाठी तुझी सोबत हवीय मला.. पण परतीची वाट सापडतच नाही का तुला.. आठव तू काय दिलेला शब्द तुझ्या या प्रियेला.. आस लागली या मनाला.. धरवेना धीर आता कुठे शोधू तुला..? काळाची पावलेही मंद झालीत वाटतंय.. एकेक पळही युगासारखा भासतोय.

तू निरोप घेऊन गेलास लवकरच परत येतो म्हणालास.. अभिमान वाटतो रे मलाही मी तुझी अर्धांगिनी असल्याचा.. तू तिथे युद्धभूमीवर असतोस.. पण त्याचा थरार मी इथेही अनुभवते.. तू लवकर परत यावास म्हणून रोज देवाकडे मागणे मागते. मन तुजकडे धाव घेते. पण वेडे आहेत हे लोक तू येणारच नाही म्हणतात. हे मनातलं काहूर मी सांगू कुणाला.. घेऊन येईन मी तुज माघारी, थरथरते मन प्रश्न विचारी.. कुठे शोधू तुला..!

आजचा चित्र चारोळी स्पर्धेचा विषय पाहताच.. रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला.. या शांता शेळके यांच्या ओळी मनात रूंजी घालू लागल्या. कृष्णाने गोकुळ सोडल्यावर यमुनातिरी धाव घेऊन कान्हाचा शोध घेणाऱ्या विरहव्याकूळ राधेचे चित्र डोळ्यासमोर आले.. जंगलामध्ये झाडावेलींना, पशुपक्ष्यांना आर्त साद घालून माझी सीता तुम्ही पाहिली का..? असे विचारणारा सीतेचा राम आठवला. आठवली ती विरहाग्नीत चौदा वर्षांचा वनवास सोसणारी उर्मिला.. सैनिक पत्नीच्या नजरेतली प्रतिक्षा.. प्रियकराची वाट पाहणा-या प्रेमिकेच्या मनात उठणारे काहूर.. आपली प्रिय व्यक्ती नजरेआड झाल्यानंतर केवळ तिच्या आठवांवर जगणे असह्य होते नि मन साद घालू लागते. पण प्रतिसाद मिळत नाही तेव्हा सुरू होतो शोध.. अन् सतावतो प्रश्न.. कुठे शोधू तुला?

वाट पाहून थकलेल्या नजरेचे चित्र पाहून आज समूहात मंगेशदादांची लेखणी न थकता धावत होती. वाट पाहण्यातील आतुरता, हुरहूर, डोळ्यातील आर्जव, अन् कुठे शोधू तुला हा सतावणारा प्रश्न घेऊन होणारी कासावीस लेखणीतून व्यक्त केलीत. कुणी व्यथांचीही आरास मांडली‌. चित्रातील वेदना शब्दातून व्यक्त झाली. आपला सहभाग व उत्साह वाढतोय याचा मनस्वी आनंद झाला. सहभागी रचनाकारांचे अभिनंदन व पुढील लेखणी शुभेच्छा 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. 🙏

स्वाती मराडे,पुणे
मुख्य परीक्षक कवयित्री लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles