९६वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्ध्यात आजपासून; महात्मा गांधी साहित्यनगरी सज्ज

९६वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्ध्यात आजपासून; महात्मा गांधी साहित्यनगरी सज्जपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा: विदर्भातील वर्धा शहरात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. वर्ध्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येणार्‍या प्रमुख पाहुण्यांच्या आदर सत्कारात साहित्य संमेलनात कार्य करणाऱ्या नियोजन समित्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचं प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍यावतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्‍य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्‍य नगरी सजली आहे.

*प्रमुख पाहुण्यांचं सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत*
वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामोद्योग भांडारात हे चरखे तयार करण्यात आले आहेत. हा चरखा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई करणारा पेटी चरखा देण्यात येणार आहे. शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत. उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, हा चरखा फक्त स्मृतिचिन्ह नसेल तर त्यावर सूत कताईही करता येणार आहे.

*साहित्य संमेलनाला कोणाकोणाची हजेरी?*
साहित्य संमेलन अविस्मरणीय कसे होईल यासाठी मात्र आयोजक प्रयत्न करत आहेत. समारंभाचे उद्घाटन आणि समारोपाला येणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्याचे स्वागत चरखा देऊन करण्यात येणार आहे. परंतु, हा चरखा केवळ प्रतिकात्मक स्वरुप नसून तर तो उपयोगात येईल, अशी भेट आहे. उद्घाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि संमेलनाचे मार्गदर्शक नितीन गडकरी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे आदी जवळपास 19 प्रमुख पाहुणे राहणार आहेत. त्या सर्वांना भेट म्हणून देण्यात येणारा चरख्याावर सूत कताई करण्यात येणार आहे.

*साहित्य संमेलनाची आगळीवेगळी भेट*
आजपर्यंतच्या कार्यक्रमात सत्कारात देण्यात येणाारे चरखे हे फक्त शोभेचे असायचे, असे पाहण्यात आले आहे. वर्ध्यातील ग्रामसेवा मंडळाने यंदा 16 बाय 8 बाय 5 या आकारातील लाकडी पेटीतील हे 25 चरखे तयार केलेले आहेत. गांधी आणि विनोबांच्या भूमीत होणार्‍या या साहित्य संमेलनाची ही वेगळी भेट ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles