
तुझ्याविना
तुझ्याविना …
जगायचे कसे रे आता
विरहाचे दु:ख सोसायचे रे आता
सांग मला शोधायचे कुठे रे आता
आसवांचा बांध हा थांबायचा कसा ॥१॥
तुझ्याविना…
दिस वाटे ओसाड रे आता
जणु वाटे चैतन्य संपले रे आता
हाक माझी साद तुझी मिळेल का रे आता
एकटेपणाची पोकळी भरेल का रे आता॥२॥
तुझ्याविना….
पोरकी झाली पाखरे रे आता
आबाळ झाली लेकरांची माया रे आता
पितृछाया कशी देऊ सांग रे आता
आभाळमाया बापाची न मिळे रे आता॥३॥
तुझ्याविना….
भाळावर कुंकवाचा टिळा शोभेल का रे आता
वांझ झाली सावली तुझ्याविना रे आता
जीवनाच्या कोपरात भासतो रे आता
तुझ्यासवे तुझ्याविना जगायचे रे आता॥४॥
रंजना ब्राम्हणकर
अर्जुनी/मोर,जि गोंदिया