
आवडले ना?
आवडले ना? तुला असे,
हळूवार मला छळायला
नजरेत भरून घेताना पुन्हा,
मला अलगद दूर लोटायला
कळत नाही मनातले तुझ्या,
जवळ असले की नुसतेच बघणे
दूर जाता जरा तुझ्यापासून
मग मला गवसतं कासावीस होणे
ओंजळीत भरून घेतोस चेहरा,
तेव्हा फुंकर लटकी बटांवर उडते
चिडताच मी जरा का? तुझ्या,
चेहऱ्यावर विजयी हास्य फुलते
आवडले ना?तुला मला असे,
तुझ्यातच गुंतवून ठेवायला
सावरताना मला माझ्यापासून,
तुझ्या मनाच्या कोपऱ्यात लपवायला
झाले तुझीच आता वेगळी कुठे,
मी राहिले तुझ्यापासून बघ ना!
मी प्रेमबावरी राधा झाले तुझी,
अन् तू माझा झालास मनमोहना.
सौ.सविता वामन ठाणे.
=====