
मानव असाही,मानव तसाही
परवाच एका प्रसंगाला सामोरी गेले. गोष्ट अगदी साधी होती. मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणे. यश संपादन करून एक दिवस झाला होता. व्हाॅटॲप समूहावर अभिनंदन केले होते. पण स्वतः जातीने अभिनंदन प्रत्यक्ष करायचे होते. काही कारणास्तव यशकर्त्या व्यक्तीला भेटू शकले नाही. पण दुसर्या दिवशी प्रत्यक्ष भेट घेत मी अभिनंदन केले. पण समोरून खूप कोरडे शब्द आले.”ठीक आहे”
अभिनंदनाचा हातही नीट हाती घेतला नव्हता. मला खूप वाईट वाटले. दोन दिवस विचारातच गेले त्या व्यक्तीने असे का केले? आपला राग आला का? बरं रागाचे कारण तरी काय? अनेक विचारांचे काहूर मनी रूंजी घालत होते. दुसर्या प्रसंगात पुणे येथे “नवी दिशा नवे उपक्रम” पुस्तकाचे प्रकाशन झाले.येणारा प्रत्येक व्यक्ती वसुधाला भेटायला आतूर होता.जवळ येवून आदबिने चौकशी करत होता.कामाचे कौतुक करत होता. तसेच मराठीचे शिलेदार समूह तर खूपच वेगळा. इथे सर्वजण एकमेकांशी ताई,दादा नावाने संबोधतो. कौतुक करतो,प्रोत्साहन देतो. पुरस्कृत करताे. शब्द तोकडे पडतात कौतुक करताना.
असे माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू पाहायला मिळतात.
आवडणार्या व्यक्तीचे कौतुक करताना शब्द ओसंडून वाहतात. पण नावडती व्यक्ती असेल कौतुकाचे शब्दच हरवून जातात. मानव असाही आहे. मानव तसाही आहे. राग, लोभ, मत्सर, द्वेश, प्रेम, माया असे मानवाच्या स्वभावाचे विविध पैलू आहेत. पण या स्वभाव गुणवैशिष्ट्याचा मानव योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी उपयोग करत नाही. अगदी आपणही आपल्या नकळत या स्वभावाचा कसा उपयोग करतो?याचे परीक्षण करूया. आणि हो मानवा जी बुद्धी देवाने दिलीय.इतर प्राण्यांपेक्षा जो तल्लख मेंदू दिलाय. विचार करण्याची ताकद दिलीय.याचा वापर करून योग्य ते करावे.म्हणजे खरच माणूस माणसाला कमी समजणार नाही.वाद होणार नाही. सामंजस्याने संसार चालेल. चला तर आपण सारे हाती हात घालून चांगले तेच करावे, वागावे हे मनावर बिंबवूया.
वसुधा नाईक, पुणे
========