
माई रमाई
माय माऊली रमाई
जगी ठरली महान
तुझ्या ग कष्टाचे मोल आई
लिहीण्यास मी फार लहान
डोळे पाणावले ग माझे
आयुष्याचा प्रवास तुझ्या
आठवताना, कंठ दाटून आला
जिवंत यातना भोगून तुझ्या
पोळून निघालेला एक जिव
सुखासाठी जन्मच तुझा नाही
माहेर सासरची पंढरी गाठली
एकटीनेच संसाराचा गाडा ओढली
या प्रज्ञासूर्याची तू ग ठरली
शितल छाया महान रमाई
तुझ्या ग उपकाराचे पांग
फेडू ना शकतील कधी आई
हे मरणा थांब जरा
जरा जगून घेऊ दे
आज माझ्या माईचे गुण
मज डोळे भरून गाऊ दे
सारिका गेडाम, चंद्रपूर