‘रोज’ प्रेमाने पोट भरतं; प्रा तारका रूखमोडे

‘रोज’ प्रेमाने पोट भरतं; प्रा तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उत्तर थंडीची लाट म्हणजेच गुलाबी थंडी आली की प्रेमभावनेला उधाण येतो..ही भावना प्रकट करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रेमसप्ताह जगभर विविध ठिकाणी आनंदात साजरा केला जातो.त्यातलाच आज पहिला दिवस.. सात फेब्रुवारी ‘रोज डे’ .. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबपुष्पाची निवड केली जाते.. आशिया,युरोप, उत्तर अमेरिका इत्यादी ठिकाणी गुलाबाची फुले मुबलक आढळतात. ही सदाहरित वनस्पती आहे. 1000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.
‘पांढरा गुलाब’ हा मैत्रीच्या मजबूत बंधनाचे प्रतीक म्हणून वापरला जातो. ‘लाल गुलाब’ प्रेमीजन प्रेमाचं प्रतीक म्हणून एकमेकांना फूल देऊन प्रेम व्यक्त करतात.

प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाच्या खरेदी विक्रीतून आज ‘रोज डे’ च्या दिवशी करोडोची उलाढाल होते. तसेही फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो त्यामुळे दररोजच गुलाबांच्या फुलांची उलाढाल होते.. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांच्या रोजी रोटीचा आधार हा गुलाब फूल बनतोय. गुलाबांच्या फुलांची मागणी वाढत आहे. वर्षभर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून गुलाबांना मागणी येतच असते त्यातून अनेक शेतकऱ्यांनी फूल शेतीची कास धरली आहे व फूल शेती करणारे शेतकरी बाजारपेठेतील ठोक विक्रेत्याला गुलाबाची फुले विकतात. तिथून त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते फूलं विकत घेतात व ते सर्व सर्व ठिकाणच्या बाजारपेठेत पाठविले जातात. त्यातून पुष्पगुच्छ तयार करणे..व फुलांच्या माळा तयार करणाऱ्या कारागिरांना जवळपास 5000 कुटुंबांचा उदरनिर्वाह यातून होतो. गावरान फुलांपेक्षा डच व सीडी गुलाबाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपणही एक गुलाब पुष्प खरेदी करून आपले आई-वडील प्रिय व्यक्ती यांना अर्पण करून एखाद्या गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावू या.. गुलाब पुष्प दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles