
‘पॉकेट मनी’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन
नागपूर : शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी ‘पॉकेट मनी – आधार की अंधार’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी टिळक पत्रकार भवन सभागृह येथे करण्यात आले. यावेळी मंचावर चित्रपटाच्या दिग्दर्शिका डॉ. अश्विनी झिलपे, लेडी आयर्न मॅन म्हणून ओळख असलेल्या डॉ. अश्विनी धोटे, मिसेस इंडिया वन इन ए मिलियन ब्युटी पिजंट हा किताब मिळवलेल्या श्रीमती कल्पना साबळे , डॉ. पोद्दार मॅम (प्रिन्सिपल, शिवाजी सायन्स कॉलेज) आणि कुमार मसराम सर हे मान्यवर उपस्थित होते.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी डॉ. अश्विनी झिलपे यांनी उपस्थित पत्रकारांना चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच इतर वक्त्यांनी देखील या चित्रपटाबद्दल आपली मते सांगितली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना डॉ. अश्विनी झिलपे यांना उत्तरे दिली.
त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. चित्रपटाला पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. पॉकेट मनी हा चित्रपट MX PLAYER या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर
अगदी मोफत उपलब्ध आहे.
https://mxplayer.in/detail/movie/de909d153a3264e6ee8ea5e0e483e87f