
अरण्यश्वेर शिक्षण संस्थेत दहावीच्या विद्यार्थांना निरोप
वसुधा नाईक,प्रतिनिधी
पुणे: दि.८/०२/२०२३ रोजी अरण्येश्वर शिक्षण संस्थेच्या हाॅलमधे इ.१० वी चा निरोप समारंभ म्हणजेच (सदिच्छा समारंभ) पार पडला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब ढुमे,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डाॅ.सौ.भावना जोशी ,प्राथमिक विभागाच्या सौ.अनिता गायकवाड,सर्व सहकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी हजर होते.
प्रथम सरस्वतीचे पूजन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इ.नववीच्या सलोनी वर्हे हिने केले. सौ.ज्योती पूरकर यांनी आपल्या भाषणातून मुलांना पुढील जीवनातील वाटेवर कसे ठाम मार्ग काढायचे तसेच लहानपणापासून आत्तापर्यंतचा विद्यार्थी प्रवास उलगडला.पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या. डाॅ.सौ.भावना जोशी बाईंनी मुलांचा पुढील शैक्षणिक प्रवास कसा असेल.आपल्या शाळेचा रिझल्ट १००% लागावा ही अपेक्षा सांगून शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या अ,ब,क या वर्गातील प्रतिनिधी मुलांनी आपले मनोगत सांगितले. त्यानंतर आभार मानले गेले.व कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला व सर्व शिक्षकांचा निरोप घेतला.