
फुलली प्रीत
थोडं मनातलं तुझं
थोडं मनातलं माझं
चल करूया उघड
अंतरंग दोघाचं..
थोडं चांदणं तुझं
थोडं चांदणं माझं
दोघं मिळून घालू
आभाळाला साज..
एक धागा तुझा
एक धागा माझा
गोफ मिळून विणू
दृढ विश्वासाचा..
एक रंग तुझा घेऊ
एक रंग माझा
एकरूप असे होऊ
नसे रंग दुजा..
तुझे माझे करत
विरूनिया गेलो
एकरंगी न्हाऊनिया
एक जाहलो..!
नजरेतलं तुझ्या
स्वप्न मज नयनी
मोहरत फुलली
प्रीत क्षणोक्षणी..!
स्वाती मराडे, इंदापूर, पुणे
======