
मोरपीस तू
तुझ्या सहज बोलण्याने
विरघळत जाते मनी..
तुझ्या सहज मिठीने
अलगद तरंगते अंतरंगी…
हसून रुसवा काढणे
त्यातला गोडवा सांगणे
मनीचे ओळखुन घेता…
प्रितिचा बहर फुलवणे
राग आलाय खरय हे दाखवून
मी कुठं चिडलो म्हणतोस…
रागातूनच प्रेम व्यक्त करणं
सवयीने असाच आहे म्हणतोस
जबाबदारीची जाणीव म्हणून
धरलेले प्रेम सोडतोस…
पळता पळता पडतेस म्हणून
पुन्हा तुझ्या डोळ्यात अडकवतोस
प्रेम असून नाही सांगणे
नसून ते कृतीतून व्यक्त करणे
हळुवार अलगद मन टिपून…
पुन्हा नव्याने ते जपणे
कान्हाच तू…मोरपीस तू
देवत्वाची प्रचिती आणतोस
कधी दगड तर कधी खडूस
अवखळ लिलेत अवखळतोस
सिंधू बनसोडे .इंदापूर.पुणे
========