
अबोल प्रेम ते…
अबोल प्रेम ते …
न बोलताच मनातील गुजकळे
सख्या तुज पाहता
रात्रीचा चंद्र ही मज हसे
मनीचा निरोप सख्या गालावर दिसे
बेभान मन होऊन
वाऱ्यावर प्रित झुले
सागराच्या लाटांवर मन
माझे आनंदाने डोले
तुझी माझी प्रीत पाहुनी…
झाडाच्या पानांनी सूर गायला
मंजुळ वाऱ्याने साद घातली
सुगंधाने आसमंत मंत्रमुग्ध झाला
चंद्र चांदण्या मनी ओशाळल्या
भाव प्रीतीचा मनी भावला
जगरहाट पाहता
मनावाटे भीती
लग्नानंतर आटेल का रे
आपणा दोघातील प्रीती…
सुजाता गडसिंग
इंदापूर पुणे
======