‘ओढ तीच….विश्वासाच्या नात्याची…!;सविता पाटील ठाकरे’

‘ओढ तीच….विश्वासाच्या नात्याची…!;सविता पाटील ठाकरे’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न परीक्षण_

होय….माझं मन मला सांगतय की तो नक्की येईल.. मी वाट पाहील त्याची..अगदी शेवटच्या श्वासापर्यंत… कारण माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. आठवते मला….
समाजाच्या साऱ्या बंधनांचे पाश तोडून मी त्याला होकार दिला होता,
त्याच्या खऱ्या प्रेमाचा स्वीकार केला होता…. तो प्रतारणा नाही करणार, कारण.. माझ्या इतकाच तोही,
माझ्यात गुंतला होता.

प्रेम या अडीच अक्षरी शब्दांच्या बंधनाने आम्ही एकत्र आलेलो.. जातीपातीची बंधनं कधीच झुगारून दिलीत..नवं काही करण्याची उमेद ठेवून….. असतील त्याला काही अडचणी…… मी नाही तर कोण समजून घेणार त्याला???

ओढ अजून तीच आहे
माझी त्याच्या प्रती,
भले असेल दुरावा जरी
बहरेल पुन्हा आमची प्रीती..
ओढ अजून तीच
अन् प्रेमही तेच आहे….
गालावरच्या रक्तीमाला
तोच गंध खुलवत आहे….

ओढ अजून तीच…. मग ती प्रियसीला प्रियकराची असो की जलधारांना जमिनीची…. वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची असो की,भक्तांना साई दर्शनाची.

ओढ अजून तीच शाळेची आणि शाळेतल्या वेड्या मायेची.
काळजातल्या त्या तुकड्याची आणि पहिल्या वहिल्या प्रेमाची…
गणपतीच्या आगमनाची आणि मंगळागौरीच्या फेऱ्याची..
गावाकडच्या मातीची आणि सोबत शहरी सौंदर्याची…
हातातील लेखणीला काव्यांगण फुलवण्याची..
आणि त्या झोपाळ्यावर शब्द झुला झुलविण्याची…
ओढ अजून तीच आहे चिमणीला आपल्या पिलांची..
घरट्याकडे झेप घेण्याची अन दाणे भरवण्याची… हंबरणाऱ्या गाईची वासरांच्या मायेची..
ओढ अजून तीच आहे माणसाला निसर्ग सहवासाची…
येणाऱ्या शिवजयंतीची…
बहिणीला भाऊबीजेची आणि भावाला रक्षाबंधनाची….
ऐक्याची आणि विकासाची…
ओढ चुलीवरच्या त्या गरमागरम भाकरीची..
पुरणपोळीच्या खमंग चवीची…
पाट्यावरच्या लाल मिरचीच्या ठेच्याची…
गावाकडच्या पारावरील गप्पांची…
अन् त्या लग्नाच्या जुन्या गाण्यांची….

‘अर्थात तुमच्या गुंतलेल्या हृदयाच्या आर्त हाकेला जो आपसूकच ‘ओ’ देतो त्याला ओढ म्हणतात.’

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘ओढ अजून तीच’ हा विषय देऊन सर्व काव्यप्रेमींना लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. तसं पाहता या विषयाची खोलीच एवढी गहन आहे, की त्यात तळापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य होते; तरी असता आपण सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आणि वैविध्यपूर्णरित्या व्यक्त होत सरांना अभिप्रेत असलेले काव्यांगण फुलविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन…!

✍️पण थोडे काही…

मानवी जीवनाचा व साहित्याचा निकट संबंध लक्षात घेऊनच रामदासांनी ‘नसता कवींचा व्यापार, तरी कैसा जगत् उद्गार!’असे उद्गार काढले आहेत. साहित्यजीवनावर-मानवी मनावर विविध तऱ्हेने परिणाम करते. साहित्य मग ते कोणत्याही प्रकारचे असो. व्यक्तीला रिजवील, सुखवील,विरंगुळा देईल,त्याचबरोबर आशेचे किरण दाखवेल,नव विचारांचा प्रकाश देईल, ध्येयाचे स्फुरण देईल, मानवी व्यवहार,मानवी मन यांची गुंतागुंत उलगडून दाखवेल. विचारशक्तीची धार वाढविणे, बुद्धीचे क्षितिज विस्तृत करणे, भावनांचा विकास करणे ही कार्य साहित्यच करू जाणे! म्हणून श्री खांडेकर म्हणतात ज्याने वाचकाच्या बुद्धीचा व भावनांचा विकास होतो इतकेच नव्हे तर ज्याच्यामुळे जीवनाकडे सहानुभूतीने पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होते तेच खरे वाङ्ममय! तेव्हा असे वांडमय घडवण्याचा संकल्प करू या…!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक कवयित्री लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles