
‘महिला व रुढी परंपरा’; रूपाली म्हस्के
उभारावी गुढी
रूढी परंपरेची
आपणाच करावे
जतन संस्कृतीची
गोंधळीला उब असते मायेची, तिला छत्तीस भोके पडले असली तरी,कारण पुर्वी चे काळी आता सारखी सुख सुविधा उपलब्ध नव्हत्या,माहेरची ओढ पण लवकर जाण्याच साधनं नाही, मनातल,सुख, दुःख सांगायला आता सारख मोबाईल नाही, त्यावेळी सासुरवासाचे प्रमाण पण खुप होते.पण आता आपणांस कळणार नाही .कारण फॅशन, सुंदर आणि आधुनिकीकरण्याचे नादात आपण काय काय विसरत जात आहोत आणि गमवत आहोत हे आपणांस लक्षातच येत नाही आहे.
आपल्या संस्कृतीच्या सर्वच रूढी परंपरा वाईट नाही, बऱ्याच रुढी परंपरेला शास्त्रीय कारणे पण आहेत आणि आपण शिक्षणातून आणी वाचनातून आपल्या कानावरून गेल आहे पण आपण या कडे किती काना डोळा करतो आपणा सर्वांना माहितच आहे.आपल्या संकृती मधल्या आपल्या घरामधल्या अलिखीत चांगल्या चालीरीती घरातील वयस्क किंवा मोठी एक स्री दुसऱ्या स्त्री ला सांगत असते आणि ती पुढच्या पिढीला सांगितली जाते.कारण घरात पुरुष मंडळी पेक्षा स्रींयांना आपल्या चालीरीती विषयी जास्त माहिती असते.परंतु या टिकवण,जपण, सांभाळन आणि जतन करण शेवटी आपल्याच हातात आहे.कारण शेवटी स्री फक्त घराचाच कणा नाही तर तीला आपली संस्कृती तसेच चांगल्या चालीरीती रुढी परंपरा टिकवीण्यासाठी माॅ जिजाऊ सारख कणखर कणा होणे महत्त्वाचे आहे.
आधुनिकीकरणाच्या आणि दुसऱ्याच सगळ चांगल आणि आपल खराब म्हणण्याचे नादात परत बाहेरचे येऊन आपल्यावर
राज्य करणार नाही याची काळजी आपणच घेतलेली बरी.जुन्या असोत कींवा नव्या पिढीच्या मनावर घेतलं तर आपण सगळंच करू शकतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे.फक्त अगदी मनापासून प्रयत्न करा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आपल्या चांगल्या रूढी परंपरा आणि संस्कृती जतन करण्यासाठी.
जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती साऱ्या जगाची उद्धारी…
सौ.रुपाली म्हस्के, मलोडे.गडचिरोली.