‘संस्कारांच्या श्रृंगाराने जीवनाला सोनं बनवणारी फक्त ‘स्त्री’; प्रा. तारका रूखमोडे

‘संस्कारांच्या श्रृंगाराने जीवनाला सोनं बनवणारी फक्त ‘स्त्री’; प्रा. तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत:’ जिथे नारीची पूजा होते तिथे देवता निवास करतात. ‘स्त्री’ सृष्टीची सर्वात सुंदर निर्मिती. विश्वास, त्याग, वात्सल्य,सन्मान, आत्मसमर्पणाची मूर्तीमंत प्रतीक सप्तगुणांची. मीरा, सुलोचना, राधा, सीता दुर्गा, काली, द्रौपदी अनुसयेचंच रूप. मर्यादा तिचा अलंकार. जीवनाला सोनं बनवते संस्काराचा करून शृंगार. बीज उगवणाऱं जणू धरतीच रूप. सृजित करते रूप अनुप. सहचारिणी बनून सोबत जन्मभर. फुलविते संसार स्वतःला करून अर्पण. करते सर्वांचा उद्धार करून बलिदान इच्छाशक्तींचा. सजवते घर संसार..नारी वृक्षासमान.. अविरत देणे हा तिचा स्वभाव.. जीवनाला आकार देणारी,अर्थ देणारी, ऊर्जा देणारी, रंगाची होळी तिच..मनाचा अनुबंध..सृष्टीचा ऋणानुबंध… चैतन्यमय बाल्य.. तेजस्वी तारुण्य.. तरी स्त्री किती स्थितप्रज्ञावंत.!!

खरंच किती ईश्वरी रूप नं नारीची. विद्येतआदर्श सरस्वती.. धनात लक्ष्मी.. शक्तीत दुर्गा..पवित्रतेत गंगा.. पण तरीही तिला पुरुषप्रधान संस्कृती दुय्यम स्थान, पुरुषांच्या विकृत मानसिकतेला तिला नाहक बडी पडावे लागते.तिच्या क्षमतेवर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात कुठे ती कमी पडते आहे? ती तर सर्वच बाबीत आघाडीवर आहे..

दैनंदिन जगण्याच्या लढाईत तिला विविध रूपांची पुटं अंगावर चढवावी लागतात. घरात वात्सल्याचं प्रसन्न प्रेमळ रूप. तर उंबरठा ओलांडला की स्वतःभोवती कणखरपणाचे संरक्षण कवच ओढून करारी रूप, कामाच्या ठिकाणी दृढनिश्चयी साहसी रूप,घराकडे परतताना कठोर विलक्षण रूप, वात्सल्याची मूर्ती होऊन आईच्या गृहिणीच्या भूमिकेत शिरताना उबदार पखरण करते, घर ‘परिघात’ ‘थकवा’ नसतोच. घराचा कणा बनूनी तिचं व्यवस्थापन मजबूत ठेवते, नाती जपते.. जगण्यातल्या युद्धसदृश समस्यांचे निराकरण ती कुणाच्याही पाठिंब्या विना स्वतःच्या शक्ती व युक्तींनिशी करते, तिचा मानसिक कणखरपणा या सर्व प्रवृत्तीवर मात करून तिला उंच भरारी मारण्याचे बळ देतो. तिच्यात असणाऱ्या ऊर्जेच्या अखंड स्त्रोतामुळे अन्यायाला लाथाडून अधिकच तेजस्वी होते बुद्धीचातुर्याने समन्वय साधते, स्त्री सुलभ गुणांना लडिवाळपणे जपते. सौंदर्य रूप ती मनापासून धारण करते. आदिशक्तींची कसोटी नऊ दिवसांची पण हल्लीच्या स्त्रीशक्तीची कसोटी अहोरात्र चालू असते.. तरी ती पूर्ण करते.. तिला समजून घेणं आकलनाच्या पलीकडे असतं, तिच्या शक्तीत सामर्थ्याला, बुद्धी कौशल्याला, मानसिक कणखरतेला पुरून उरण्याची क्षमता असते. मग सांगा नारी ही अबला का?

वैद्यकीय व्यवसायापासून तर प्रजासत्ताक दिनाचे राजपथावर संचलनाचे, हिमालयाच्या उंच शिखरावर पोहोचण्याचे, अवकाशात उंच भरारी घेण्याचे, संरक्षण क्षेत्रासारख्या पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने भरारी घेतली..इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, स्वरकोकीळा लतादिदी, कल्पना चावला,माधुरी दिक्षित,ताराबाई मोडक, सावित्रीबाई फुले, मेघा पाटकर सारख्या झुंजार, बहिणाबाई ते दुर्गा भागवतापर्यत इतिहासाच्या मंचावर उमटणारा कर्तृत्ववान स्त्रियांचा पदन्यास..त्यांचा स्वर, त्यांचे शब्द, कृती प्रेरणादायी

म्हणूनच विश्वातील अर्धी मानवी शक्ती स्त्री आहे,महिलांना आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक स्वरूपात सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे व काळाची गरजही आहे. तिला जरी दुय्यम स्थान पण दुय्यमाशिवाय प्रथमही निष्फळच. म्हणून प्रथम व दुय्यमच्या शब्दभोवऱ्यात न पडता समानतेच्या पातळीवर अबला व सबला या शब्दाचक्रात न गुरफटता, फक्त ‘बल’ म्हणजेच ‘बळ’ म्हणजे शक्ती मानावे ..स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन पंख आहेत, सारखेच सामर्थ्यशाली आहेत. तिला संधीची समानता मिळाली तर ती सामर्थ्यवान बनेल..!

म्हणूनच सख्यांनो शिक्षण घ्या..मुलींना शिक्षण द्या ज्यातून चारित्र्य घडेल…शिवबा घडेल .मनाची शक्ती वाढेल.. बुद्धीचा विकास होईल व स्वावलंबी बनता येईल.. जिद्द मेहनत धाडस या बळावर व्यवसायातून यशस्वीपणे समृद्धी खेचून आणता येईल..समाजातील विकृत मानसिकतेत तेजस्विनी बनून परिवर्तन घडवून आणूया ..समर्पित भावनेने व कणखरपणे स्त्री-शक्तीचा खरा जागर करूया..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर,जि. गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles