‘महिला सक्षमीकरण’; अनिता व्यवहारे

‘महिला सक्षमीकरण’; अनिता व्यवहारेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता’. म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते, त्यांचा मानसन्मान होतो. त्या ठिकाणी देव-देवता रममाण होतात. स्त्री मुळात सामर्थ्यवान आहे, म्हणूनच परमेश्वराने ही सर्व खाती देव्यांकडे सोपविली. ज्ञान खाते सरस्वतीकडे, धनाचे खाते लक्ष्मीकडे, संरक्षण खाते कालिकादेवी कडे, अन्न अन्नपूर्णा देवीकडे. खरे पाहता, भारतीय संस्कृतीत आपण महिलेस सरस्वतीचा दर्जा दिला खरा, पण तिच्या शिक्षणावर खर्च करणं, भविष्याची गुंतवणूक वाटत नाही. जिला लक्ष्मी मानतो तिच्या हाती आर्थिक सत्ता देत नाही. एकीकडे तिला रणरागिनी म्हणायचे ; तर दुसरीकडे तिला मत मांडण्याचे ही स्वातंत्र्य देत नाही. मात्र गेली शंभर वर्ष झाली तिच्या गुणांच्या ओव्या गाण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करतोय.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्षे झाली पण येथील स्त्रियांना सामाजिक समता मिळवून दिली काय? अत्याचार कमी झाले काय? तर याचे उत्तर आहे, नाही.पूर्वी स्त्रीयांच्यावर अन्याय होत होता. त्यात आता बदल झाला म्हणजे काय झालं? तर पूर्वी केशवपन, सतीची चाल, बाल हत्या अंधश्रद्धा, भ्रूणहत्या होती; तर आता एकविसाव्या शतकात सुधारणा म्हणजे देवदासी, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण. पण समाजरूपी रथ विकासाकडे दौडवायचा असेल तर पुरुषरुपी चाका सोबत स्त्रीरुपी चाकाला ही विकासाची तेवढी चालना देणे गरजेचे आहे.

विज्ञानानं देशाची प्रगती साधली असं म्हणतात. पण या प्रगतीत स्त्रीला काय मिळालं? पूर्वी स्त्रीला सती जावं लागायचं. पण किमान तिला सती जाण्यापूर्वी निदान जन्माला तरी घातला जात होतं. आजचे विज्ञान मात्र तिला जन्मालाच येऊ देत नाही. तिला गर्भातच संपवले जाते आणि म्हणूनच महिला सक्षमीकरण, महिला विकास महिलांसाठी 50 टक्के राखीव जागा यासारखे प्रलोभने तिला दाखवली जाऊ लागली. आहे. ती एक गरज झाली आहे. त्यांना शिक्षणात सवलती दिल्या जात आहेत. स्त्रिया शिकल्या, आत्मनिर्भर झाल्या म्हणजे सक्षम होणार नाहीत. कारण त्या पुरुषी वर्चस्वातून मुक्त झाल्या नाहीत. अपार कष्ट त्यांच्या वाट्याला आल आहे. महाराष्ट्र सरकारने स्त्री शिक्षण काळाची गरज ओळखून तिच्या कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी सवलतींचे बळ दिलं असलं तरी याचे खरे श्रेय जाते ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांना. त्यांच्यामुळे स्त्री स्वतःचा ज्ञानाचा दरवाजा उघडून आत मध्ये प्रवेश करीत आहे. ज्ञानाचा,आत्मभानाचा किरण तिच्या जीवनात येऊ पाहत आहे.

मात्र आज हा ‘महिला दिन’ सोहळा हेच करीत आहे. अनेक वेगवेगळी आमिषे तिला दाखवून बळी पाडण्याचा प्रयत्न करतोय. ज्या परमेश्वराने तिचं एवढं सुंदर रूप निर्माण केलं ते फक्त सतत दोन हात जोडून आम्हाला न्याय द्या, आम्हाला वाचवा, म्हणण्यासाठीच नाही.लवकरच समाजाला प्रचिती येईल की युगानुयुगे असलेली स्त्री जन्माची दर्दभरी कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल. कारण आज लोकसंख्येची भरगच्च आकडेवाडी वाढवणारा हा समाज स्त्रीची आकडेवारी मात्र वाढवू शकलेला नाही आणि म्हणूनच ही नस्ती उठाठेव या समाजाला करावी लागत आहे. आजच्या स्त्रीला हे समजलय की, ज्याच्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेणारी गांधारी फक्त त्यागाची मूर्ती हे लेबल लावून घेणारी ठरली आहे. म्हणून तिनं बदलायचे ठरवले आणि म्हणूनच ती म्हणू लागली आहे, ‘आम्हाला स्त्री दाक्षिण्य नको आहे’, तर, व्यक्ती म्हणून स्वतःसाठी व इतरांचे जगणे, स्वतःचा मान राखणे, राखून घेणे यावरच मी भर देते आणि माझा आणि माझ्यात प्रतिष्ठेवर मानवी प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करेल, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी’, ही ओवी गायला सर्वांनाच भाग पाडील.

महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles