
धन्य ती सावित्रीबाई फुले
धन्य ती सावित्रीबाई फुले
स्त्री जातीच्या हक्कासाठी
स्वतःच संघर्ष करुन ती
न्याय देऊन गेली महिलासाठी
विपरीत घडले त्या माऊलीवर
शेणाचे गोळे अंगावर घेतले
ना घाबरली ना डगमगली
मर्दानी बनुन संघर्ष केले
ज्योतीबाच्या साहाय्याने
हिंमतीने घराबाहेर पडली
न्यायाची हाती मशाल घेऊन
ताट मानेने खंबीरपणे लढली
स्त्री जातीसाठी हक्काची
शिक्षण ज्योत लावली
ज्ञानाची शिक्षणवृती
महिलांना शिक्षित बनवली
आज सावित्रीबाई मुळेच
आम्ही महिला सक्षम झालोत
स्वतःच्या पायावर उभे राहून
स्त्री आज कर्तबगार झालेत
तिची अविस्मरणीय गाथा
सर्वांच्या स्मरणात सदैव राहीत
जागतिक महिला दिनानिमित्त
क्रांतीज्योतीस अभिवादन करीत
सौ.पुष्पा डोनीवार
बाबुपेठ चंद्रपूर