पण का..?

पण का..?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सागराच्या लहरी असतात पोरी
सूर्याची किरणे भासतात पोरी
माणुसकीचे दुसरे अंग असतात पोरी
पण का ? घराघरात रडतात हो पोरी

फुलांचा सुगंध असतात पोरी
जिजाऊच्या रूपातही भासतात पोरी
माय बापाच्या विश्वासावर उतरतात पोरी
पण का ? गर्भामध्ये मारल्या जातात हो पोरी

घरातील सुगंधासाठी चंदन होतात पोरी
उन्हामध्ये सावलीचा आनंद देतात पोरी
दरवर्षी परीक्षेत अव्वल येतात पोरी
पण का ? भर रस्त्यावर छळल्या जातात हो पोरी

मायेच्या उंबऱ्याची मर्यादा असतात पोरी
कुटुंबाला नात्यामध्ये घट्ट विणतात पोरी
सासरी प्रकाशाचा दीप लावतात पोरी
पण का ? चुलीच्या भडक्याने पेटतात हो पोरी

अंगणातील तुळस अन् मायेचा कळस असतात पोरी
पवित्र नात्याला प्रेमाची साद घालतात पोरी
माय बापाचा अभिमान अन् देशाचा स्वाभिमान असतात पोरी
पण का ? अस्तित्वाच्या गाभाऱ्यात दु:खी असतात हो पोरी

प्रा.पांडुरंग मुंजाळ
वसमत जि.हिंगोली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles