
होळीचा सण
सण होलिकाचा
ऋतुराज वसंताचा
बहरली पाने फुले
आनंदी वातावरणाचा
दुःख चिंतन दहन
दुःख प्रवृत्तीचा नाश
ध्यास घेऊन परिवर्तनाचा
इंद्रधनुष्याचे करुनी आस
सण होळीचा पुरणपोळीचा
एकरुप होऊ सारे मिळूनी
अहंकार सारा टाकू जाळूनी
प्रेमाने एकत्र ध्यास पूर्ण करूनी
रंगात रंग मिसळून दंग होऊ
आनंदाचे रंग भरुया जीवनी
माणुसकीचा हात देऊया
सारे भेद जाऊ विसरूनी
अर्पण करू होळीची पोळी
सुख समृद्धी दे घरी नांदू
आनंदाने नाच गाणे गाऊ
होळीचा सण प्रसन्न होऊ
कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर
========