नारीशक्ती

नारीशक्तीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

या ग सयांनो या ग बायांनो,या या जरा
आज,आली मुलगी माझीया घरा|धृ||

पानाफुलांनी पाळणा सजला, बांधिले तोरण!
नाव ठेवण्या सजल्या बाया, आनंदाचा क्षण!
प्रकाश पसरला जीवनी माझ्या, ऊत्साहाचा खरा |1|आज

घरादाराची लाडाची लेक,शाळेतही भूषण!
शिक्षणाची कास धरोनी, केले उज्वल जीवन!
ध्येय गाठुनी जिद्दीने, काबीज केले यशशिखरा |2|आज

विवाह करण्या आता मुलीचा, सजले हे घरकुल!
हुरहुर वाटे मनी परंतु,होई उज्वल दोन्हीकुळं!
संस्कृतीचा घेऊनी वारसा ती, निघाली अपुल्या घरा|3|आज…

उच्चपदस्थ अथवा अन्य, कामाचे इमान!
तशीच घर ही जबाबदारी ,सेवा हे प्रमाण!
उज्वल करुनी अपुल्या जीवना,देई प्रकाशाचा झरा |4|आज…

करु नका हो हेळसांड,महिला जगाचे कंकण!
अन्याय, अत्याचाराचे नष्ट करा कुंपण!
प्रगतीला पंख फुटु द्या, फुलु द्या जीवनपाखरा|5|आज
हाच महिला दिनी संदेश खरा…आज आली मुलगी माझीया घरा!

कवियत्री-कु सुलोचना मुरलीधर लडवे
साईनगर, अमरावती.
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles