रागिणी

रागिणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

त्रास देणे मानवाला,मानवाचा छंद हा
घे शिकूनी फुलांतुनी, देणे रंग आणि गंध हा !

तुटल्या नात्यांना,मी पुन्हा गाठ एक बांधिली
आवळू किती गाठीला,पाठ माझी मोडली !

स्त्री मुक्तीची दास्ता रचती,काही राजकारणी कावळे
कोण थांबविणार तिच्या,अंतरातील वादळे !

वेदना ही ,स्त्री जन्माची संपणार नाही कधीही
रागिणी पाण्यात घेते,लेकरांसहित रोजच उडी !

पाळण्याचा दोर हाती,पुरुषांनीही घ्यावा जरा
स्त्रीलाही शिकू द्या ना,जगण्याच्या विविध तऱ्हा !

त्रास देणे मानवाला ,मानवाचा छंद हा
घे शिकूनी फुलांतुनी,देणे रंग आणि गंध हा…!

सीमा वैद्य
वरोरा, जि. चंद्रपूर
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles