
स्त्री
आपल्या अवखळ हास्याने
साऱ्यांची मने जिंकणारी
एक तरी परी असावी घरोघरी
निरागस निष्पाप प्रश्नांनी
जीवनात आनंद भरणारी
एक तरी लेक असावी घरोघरी
स्वप्नपूर्ती करताना
बऱ्या वाईटाची जाण देणारी
एक तरी सखी असावी घरोघरी
हौशी ऊत्साही स्पंदनाने
मन जपणारी नी जिंकणारी
भार्या असावी घरोघरी
दोन पिढीतील तेढ
मायेने दूर करणारी
माय असावी घरोघरी
संस्कार अन् संस्कृतीला
नव्याने जपणारी
स्नुषा असावी घरोघरी
जुनं सारं नवेपणाने
समजावुन समजणारी
सासू असावी घरोघरी
घराला घरपण देणारी
अंगणात रांगोळी रेखाटणारी
सांयकाळी शुंभकरोती म्हणणारी
एकतरी नारी असावी घरोघरी.
सौ.उर्मी (हेमश्री) घरत,पालघर
====