
मालेवाडा जि.प. शाळेत महिला दिन साजरा
_नंददत डेकाटे प्रतिनिधी नागपूर_ ✍️
नागपूर: भिवापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम माता जिजाबाई व पुन्य ज्योती अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेत कबड्डी, बटाटा, फुगडी,रणिंग खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदा इंगोले, जनाबाई सहारे, शुभांगी इंगोले, रंजना गेडाम, निकिता तळणकर, दुर्गा सहारे, सविता चव्हाण,साधना रामटेके,चित्रा ऊके, कविता राठोड,पायल बावणे, शाळेतील मुख्याध्यापक श्री.वासुदेव खोंडे,प्रा.भुमेश्व़री सातपुते आदींची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.निर्मला इंगळे यांनी सहकार्य केले.कार्यक्राचे संचालन प्रा.शिला रोडे यांनी केले तर प्रा. वर्षा चापले यांनी आभार मानले.