
पुसद येथे शिवसेनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती जल्लोषात साजरी
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: आज दिनांक 10 मार्च फाल्गुन तृतीया रोजी पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.या वेळी शिवसेना नेते राजन भाऊ मुखरे जिल्हा प्रमुख उमाकांत पापीनवार राम नवमी उत्सव पुसद समितीचे अध्यक्ष विश्वजीत सरनाईक व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
निरंजन गादेवार सकल हिंदू समाज मोर्चाचे प्रमुख व त्यांचे सहकारी व धारकरी यांच्या हस्ते धर्मवीर बलिदान मास 2023 निमत्याने धर्मवीर संभाजी महारजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जमलेल्या सर्वांनी पूजन केले तसेच ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्रा चे स्मरण आणि उच्चारण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक काळे. परमेश्वर जयस्वाल शिवसेना तालुका प्रमुख संजय बयास डॉ. पंकज जयस्वाल.कैलास मस्के.दीपक परीहार. बाळासाहेब वाळ ले. नटवर उंटवल बाळासाहेब उखळकर सुभाष बाबर भारत पाटील अनंत खडसे लक्ष्मण आगाशे संतोष आर्य. किशोर बोंपैलवार, निखिल गाडेवार आरुन जाधव शाम ठाकूर योगेश रणदिवे अशोक पवार धीरज पुलाते अमर सोनटके संजय ठाकरे प्रकाश सहातोंडे पांडुरंग माहुरे दिलीप रायपुरकर रमेश सोमनी दिनेश घेनेकर दिनेश राऊत पोटे आकाश चव्हाण सुधाकर राठोड तसेच स्त्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पुसद चे 60ते 70 धारकरी उपस्थित होते व अनेक शिवभक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन शहर प्रमुख दीपक उखलकर तालुका संघटक सोपिनाथ माने शहर संघटक अनिल चव्हाण यांनी केले होते