
“जुनी पेन्शन ही शिक्षक बांधवांची म्हातारपणात जगण्याची शिदोरीआहे’; गौतम पाटील
जिल्हा प्रतिनिधी, वर्धा
वर्धा: सरकारी -निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून 01नोव्हेंबर 2005 पासून लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरिता स्वतंत्र समता शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील पुतळ्या समोरून भव्य असा लॉंग मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिल्हा परिषद, नगर परिषद सोशालिस्ट -बजाज चौक, बस स्टॉप वर्धा आणि परत पुन्हा आंबेडकर चौक अशाप्रकारे भव्य पायदळ मार्च शासनाचा निषेध करत संविधानिक मार्गाने काढण्यात आला.
आयोजित बेमुदत संपात स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील यांनी संबोधीत करताना जुनी पेन्शन ही आमच्या बांधवांची म्हातारपणात सन्मानपूर्वक जगण्याची शिदोरी आहे, न भूतो न भविष्य असे आज सर्व कर्मचारी एकजुटले आहेत. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू होत नाही. तोपर्यंत आमचा संप हा सुरूच राहणार आहे असे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
आजच्या भव्यदिव्य लाक्षणिक संपाला स्वतंत्र समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सुनील तेलतुंबडे , राज्य सरचिटणीस धर्मेंद्रजी अंबादे, जिल्हाध्यक्ष गौतमजी पाटील ,जिल्हा सहसचिव घनश्याम थुल , जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष ताकसांडे हिंगणघाट समुद्रपूर विभागीय अध्यक्ष विक्रम तामगाडगे, पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष तथा समुद्रपूर तालुकाध्यक्ष सचिन शंभरकर, राजू अवथरे,उर्वेल नगराळे ,शरद वासे, निलेश खरे ,सुभाष वनकर ,कपूरचं थुल, सुरज पाटील, अंकुश पाटील,महेंद्रजी आडे, गौतमजी वासे सर, भावना जंगले ,अंबादे मॅडम ,अश्विनी वानखेडे, वावरे मॅडम, ज्योती चारभे मॅडम. दिप्ती सहारे. व इतर महिला शिक्षिका व शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते..