‘धर्म माणसाला संपन्न करतो’; विद्याशंकरभारती स्वामी शंकराचार्य

‘धर्म माणसाला संपन्न करतो’; विद्याशंकरभारती स्वामी शंकराचार्यपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे दि.15 (प्रतिनिधी) प्राचीन धर्मशास्त्राने पुरातन कालापासून आजपर्यंत स्त्रियांना मानसन्मान व स्वातंत्र्य दिले आहे. विवाहविधीमध्ये ‘ नातिचरामि ‘ही प्रतिज्ञा सांगितली जाते, त्यात पत्नीचे स्थान उच्च ठेवण्यात आले असून सप्तपदीमध्ये वधु पुढे आणि वर मागे अशी रूढी आहे. इथेच स्त्रीचे स्थान धर्माने निश्चित केले आहे. धर्म,अर्थ,काम, मोक्ष या चारही पुरूषार्थामध्ये पत्नीचे स्थान महत्वपूर्ण मानले आहे. पूर्वीची स्त्री सुध्दा आजच्या सत्रीप्रमाणे पुरूषाच्या बरोबरीने काम करीत असे, यातूनच पूर्वीच्याकाळीही स्त्रीला समान संधी होती, हेच सिध्द होते. आपला धर्म हा नेहमीच उदार व सहिष्णू राहिलेला आहे. तसाच तो विज्ञानावर आधारीत आहे.

अगदी जन्मल्यापासून हे विज्ञान माणसाची सोबत करते.नवजात अर्भकाला गाईचं तूप, मध, सोनं उगाळून चाटवलं जातं, नंतरच ते मातेकडे दिलं जातं! हा विधी पुर्णपणे विज्ञानाशी निगडीत असून तूप, मध आणि सोनं हे घटक उर्जा आणि शक्ती प्रदान करतात. त्यामुळे बाळाची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते.अशाच प्रकारे दैनंदिन जीवनात योग्य वर्तन करणे यालाच धर्माचरण म्हणतात. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ असं सांगणारे सर्व थोर संत जगण्याचे सर्व व्यवहार आनंदाचा करावेत, अशीच शिकवण देतात. संतसंग आणि सत्संग केल्याने व्यक्ती सुखी होते, हेच सत्य आहे.म्हणूनच धर्म माणसाला संपन्न करतो.” असे मौलीक प्रतिपादन करवीर पीठाचे विद्याशंकरभारती स्वामी शंकराचार्य यांनी नुकतेच एका प्रकाशन समारंभात बोलताना केले. वारकरी साहित्य परिषदेचा ‘मृण्मयी चिन्मयी’ हा उल्का मोकासदार संपादित विशेषांक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कोकरे लिखित ‘बोध अबोधाचा’ हे पुस्तक यांचे प्रकाशन आदरणीय शंकराचार्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक प्रा. श्यामा घोणसे या होत्या. यावेळी व्यासपीठावर जेजुरी संस्थानचे अध्यक्ष, प्रसाद खंडागळे, उद्योजक ह.भ.प. माणिकशेठ दुधाने,संत तुकाराम महाराजांचे वंशज, देहू संस्थानचे प्रशांत मोरे,
ह.भ.प. मिलनताई म्हेत्रे, वारकरी साहित्य परिषद महिला अध्यक्ष ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वारकरी साहित्य परिषद आणि धुळाबापू कोकरे आरोग्य स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना देहू संस्थानचे प्रशांत मोरे यांनी ही दोन्ही पुस्तके समरसतेच्या कार्याला समर्पित केली असून सर्व समाजाला समरसतेचा भावनेने एकत्र करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद आपली पुढील वाटचाल करील, असे सांगितले.

स्त्रीरोगतज्ञ डाॅ राजेश कोकरे यांनी ‘बोध अबोधाचा’ या पुस्तकाची लेखन प्रेरणा सांगितली. ते म्हणाले, “माझ्याकडे येणा-या महिला पेशंट यांना मी माता भगवती समजून त्यांच्यावर उपचार करतो, त्यांच्या देहमनाचे तरंग समजून घेताना स्त्रीमधील अफाट शक्ती जाणवली ” अशा शब्दात त्यांनी आपल्या लेखन संकल्पना सांगितली.
‘मृण्ययी ते चिन्मयी’ या विशेषांकाचे संपादन करणा-या वारकरी साहित्य परिषदेच्या पुणे शहर कार्यवाह उल्का मोकासदार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, “हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण असून थोर संत कवयित्री आणि राष्ट्रनिर्माणात सहभागी असलेल्या महान स्त्रियांवरील लेख संपादित करणे हा अत्यंत रोमांचकारी अनुभव होता”

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. श्यामा घोणसे यांनी संत साहित्याच्या अनुषंगाने आपले मोलाचे विचार मांडले. त्या म्हणाल्या, ” समरसाताभाव हाच आपल्या समाजाचा स्थायीभाव आहे. उच-निच हा भेद मानू नये हिच संतांची शिकवण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतत पुरूष सदैव पिता, बंधू, पती आणि गुरू या रूपात स्त्रियांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे ‘स्त्रीमुक्ती’ वेगळी घडवून आणावी लागली नाही. विदेहीपणाच्या कोंदणात भक्तीचा समर्पण भाव संत कवयित्रींच्या साहित्यात प्रकर्षाने प्रकट झालेला दिसतो. संत सोयराबाई आपल्या अभंगाच्या शेवटी “आवडी म्हणतसे महारी चोखियाची” असा उल्लेख करीत असत. त्याचप्रमाणे संत जनाबाई स्वतःला ‘संत नामयाची दासी’ असे म्हणवून घेत असत. आपल्या स्त्रियांच्या जगण्याची शक्ती याच समर्पित नम्र भावात दडलेली आहे. ‘जितकी शरीरे..तितुकी मंदिरे’ असे आपण मानतो आणि या भावनेतील पावित्र्य जपण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो.

*कार्यक्रमात पुस्तक निर्मिती आणि प्रकाशन*

संबंधित सहकार्य करणा-या विविध व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप करताना सौ. तेजल दुधाणे यांनी आभार मानले व केतकी देशपांडे यांनी पसायदान सादर केले. सूत्रसंचालन सौ. माधुरी जोशी यांनी केले.

कर्वेरोडवरील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या , असेम्बली हॉलमध्ये साज-या झालेल्या या समारंभास वारकरी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व समरसता साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles