
सप्टेंबर व नोव्हेंबरचे वीज बिल वसूल करण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञाला धक्काबुक्की
_जीवानीशी ठार मारण्याची दिली धमकी_
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद: काकडदाती येथे राहणाऱ्या वीज ग्राहकाने सप्टेंबर व नोव्हेंबरचे वीज बिल थकविले होते. ते वीज बिल वसुली करण्यासाठी दि.१३ मार्च २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाला युवकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.त्यानंतर जीवाने मारण्याची धमकी दिली.शहर पोलीस स्टेशनमध्ये काकडदाती येथे राहणाऱ्या युवका विरोधात दि.१३ मार्च २०२३ रोजीच्या संध्याकाळी ५.३४ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ मनोज विठ्ठल वानखेडे वय ३१ वर्षे रा. धारमोहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून काकडदाती येथे राहणाऱ्या पवन विलास कोरडे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ मनोज वानखेडे हे वीज ग्राहकाकडे सप्टेंबर व नोव्हेंबर चे मिळून १ हजार ७०० रूपयांच्यावर विज बिल थकविल्याने वसुलीकरिता गेले होते.विज बिल भरत नसल्याने वरिष्ठ तंत्रज्ञान विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले असता पवन कोरडे याने वाद निर्माण करून अंगावर धावून गेला. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.शिवीगाळ करीत जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांनी सुरू केला आहे.