
पुसद येथे दोन दिवसीय मेहेर प्रेम संमेलनाचे आयोजन
पुसद तालुका, प्रतिनिधी
पुसद: शहरातील अवतार मेहेर बाबा आध्यात्मिक केंद्र पुसद यांच्यावतीने दिनांक १८ मार्च २०२३ ते दिनांक १९ मार्च २०२३ पर्यंत मेहेर प्रेम संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अवतार मेहेरबाबा च्या या प्रेम संमेलनात सहभागी होऊन ईश्वरी उपस्थितीचा लाभ घ्यावा असे पत्रकातून जाहीर करण्यात आले आहे.
अवतार मेहेर बाबा मेहर प्रेम संमेलनाचे पहिल्या दिवशी ध्वजारोहण, प्रार्थना, आरती, स्वागत गीत आदींचे पहिल्या सत्रात आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रामध्ये मेहेर गीत गायन आयोजित करण्यात आले आहे. मेहेर बाबा गीत गायन दुपारी २.३० वाजता पासून ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत गीत गायन केल्या जाणार आहे. यामध्ये विविध गीत गायन संचाकडून मेहर बाबांच्या गीतांचे आस्वाद मेहरबाबा भक्तांना घेता येणार आहे. दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता माल्यार्पण, प्रार्थना, आरती यासह पहिल्या सत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेली आहे. यामध्ये भक्तांना मेहरबाबांचे अध्यात्मिक लाभ घेता येणार आहे.
दुपारच्या सत्रामध्ये २ वाजेपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये काही विचारवंताकडून विचार व्यक्त केल्या जाणार आहेत. मेहेर गीत गायन यांचा सुद्धा विविध गीत गायनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आस्वाद दिल्या जाणार आहे. रात्री ८.३० वाजता चे दरम्यान प्रार्थना, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाहेर गावावरून मेहेर प्रेम संमेलनासाठी मुक्कामी येणाऱ्या भाविकांना जेवण राहण्याची व्यवस्था कार्यक्रम स्थळी कै. बाबुराव चिदरवार सभागृह, कोशटवार मंगल कार्यालय, श्री ज्ञानेश्वर संस्था गुजरी चौक पुसद येथे करण्यात आलेली आहे. कार्यक्रम स्थळी आल्यानंतर बाबा प्रेमींनी आपले नाव, गाव व मोबाईल नंबर ची नोंद करून योग्य ती पास घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मेहेर प्रेम संमेलनामध्ये जास्तीत जास्त मेहरबाबा वर प्रेम करणाऱ्या भाविकांनी येऊन लाभ घ्यावा असेही जाहीर पत्रकातून कळविण्यात आले आहे.