
डॉ. मधूसुदन घाणेकर यांची ग्रेट भेट
वसुधा नाईक, प्रतिनिधी
पुणे: दिनांक 17/ 3/ 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. मधूसुदन घाणेकर माझ्या घरी प्रत्यक्ष आले होते. अजूनही विश्वास बसत नाही. खूप उमदे व्यक्तिमत्व आहे. करारी बाणा, आत्मविश्वास, हुरहुन्नरी स्वभाव, आनंदाने जीवन जगणे,हर्षात रमणे, इतरांना सुख देणे, लहान मुल होऊन जगणे.. असे त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू पाहिले. हस्तरेषा वरून भविष्य सांगणे, चेहऱ्यावरून भविष्य सांगणे, सही वरून भविष्य सांगणे, मिमिक्री करणे, सर्वांना हसवणे, पुरस्कारांचे वाटप करणे.. अशा कितीतरी गोष्टींमध्ये आमची सायंकाळ रमणीय झाली.
शेजारच्या कर्णिक आजोबांचा 83 वा वाढदिवस होता. डॉ घाणेकर, मी स्वतः, माझी मुले, जावई, सुनबाई आम्ही सर्व त्यांच्या वाढदिवसाला गेलो. तेथे घाणेकर यांनी हॅपी बर्थडे गाणं म्हटलं. तेथील माहोलच बदलून टाकला. सर्व खुश झाले. आज त्यांच्या वाढदिवसाला एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व हजार होत. कर्णिकांना देखील खूप आनंद झाला.
माझी मुलगी कोमल हिने त्यांच्या बरोबर दोन गाणी गायली. गायनाचा आनंद घेतला. घाणेकरांचा चढा आवाज, वा अप्रतिम आहे. त्यांनी आम्हाला दोन गाणे मस्त ऐकवली. शिळ गाणे हा त्यांचे जागतिक विक्रम आहे. असे अनेक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. शेर गाणे सुद्धा त्यांनी ऐकवले. अशाप्रकारे विविध रंगी कार्यक्रमांमधून डॉक्टरांनी सर्वांचीच मने जिंकली. अशा या व्यक्तिमत्वाला शतशः नमन करते.