
कन्या निघाली सासरला
माहेरचा निरोप घेतांना मन गहिवरला
नवा मोड तिच्या जीवनी आला…|| धृ ||
पहिला निरोप पित्याचा घेतला
हा नियम का मुलीच्या वाट्याला
सोडून कसे राहणार हो मजला
पिता न बोलला मन आवरून कुरवाळी छकुलीला…|| १ ||
दुसरा निरोप दिला मातेला
माते या साठीच का जन्म दिला
तुझ्या काळजाचा तुकडा काढून टाकला
ह्दय फाटला शब्द न फुटला संसारचक्र कसा रे स्रिला…|| २ ||
नजर तिची शोधते बंधुला
त्यांच्या सोबत बालपण गेला
निरोप सांगे बंधुला विसरू को ताईला
वचन देते ताई तुजला सदैव उभा रक्षणाला…|| ३ ||
काकू,मामी,मावशी,आत्याही आल्या
संसारी सुखी हो आर्शिवाद तुजला
त्यांनाही सांगे विसरू नका है मजला
नयनी अश्रू,जड पावलांनी कन्या निघाली सासरला…|| ४ ||
यमुताई ब्राम्हणकर
अर्जुनी/मोर.गोंदिया
=====