माऊलीची माया

माऊलीची माया



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अरे माऊलीची माया
अरे माऊलीची माया
पदराखाली जपली तिने
तुझी बालपणी कोमल काया.

तुझ्या नाजूक अबोल ओठातून
वदविले तिने गोड गोड बोल
तिच्या शब्दातून शब्द वेचलेस तू
तिच्याविना तुला काय मोल.

तुला न्हाऊ माखु घातलं
तुझ आंगड टोपर धुतलं
हाताचा तिने बनविला झुला
काळजाच्या पाळण्यात झोपवलं तुला.

कष्ट करून तुझे हट्ट पुरविले
तुझ्या आवडीपाई तिला चटके बसले
भूक बाजुला ठेवून स्वतःची
घास तुला आईने भरविले.

तुझी उनाडकी ही सोसली
तुझी खोडी ही लपविली
तुला जपताना आई ने
जीव स्वतःचाच झिजवली.

याची जाण असू दे तुला
पक्षिणीच्या पाखरा
नको रे विसरु आईला
माऊलीच्या लेकरा.

बेबीताई बोईनवाड नरवाडे, नांदेड.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles