तू माय माऊली…

तू माय माऊली…पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तू होतीस सतत ऊर्जिता परसात
आनंदघनाची व्हायची जेथे नित्य बरसात
संयमाचा घाट तुझ्यासवे अलवार चढता
बळ येते अंगी सहनशीलतेने कधी लढता

ऊरी वेदनेचा डोह
कायम सक्रिय तू डांबलेला
उन्माळून येता अश्रू
स्मितवदने तोही तू झाकलेला

ऋतू जमले सलगीचे
प्रत्येकास जपता जपता
दिलेस हवेहवेसे ज्याला त्याला
लेकरांना मायेने पाहता पाहता

नवे नवे ओटीत पडता
औक्षण केलेस तूच अडचणीचे
कैक प्रश्न सोडविता सुटता
सरली दुपार गिळुनी भय पाठवणीचे

अंत नसतोच मागणीला दुनियेच्या
जात्यावर जिंदगी दिसली तरी भरडताना
अहाहा म्हणता संपले तव अस्तित्व
आयुष्य ओंजळीत सौख्याने उतरताना

म्हणूनच याद दुखरी येते ,
सलते अंतरी
तुझे नसणे या भुवरी
मान्य करताना
तुझे नसणे या भुवरी
मान्य करताना
भावपूर्ण आदरांजली आजी

उर्मी(हेमश्री) घरत,पालघर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles