सर्दी-खोकला संसर्ग वेगाने पसरत असल्याने दक्षता बाळगणे आवश्यक; डाॅ. राजीव आडकर

सर्दी-खोकला संसर्ग वेगाने पसरत असल्याने दक्षता बाळगणे आवश्यक; डाॅ. राजीव आडकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: गेल्या पंधरा दिवसांपासून दर दहा पेशंटमध्ये 4-5 जणं तरीसर्दी-खोकला-ताप या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. हा नेहमीचा साधा सर्दी- खोकला म्हणता येणार नाही. कारण पेशंटला असह्य डोकेदुखी, घसादुखी, उलट्या आणि भयंकर खोकला, अत्यंतिक अंगदुखी जाणवते आहे. ज्याला ‘व्हायरल ईन्फेक्शन’ असं म्हटलं जाते, त्याचा हा सगळा प्रादुर्भाव पसरत चालला आहे. कोरोना पुन्हा येत असल्याच्या बातम्या असल्याने लोकांमध्ये अधिकच घबराट पसरते आहे. पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे कोरोनाचे आत्ता जे व्हायरस आढळले आहेत, ते कोविड काळातील व्हायरस इतके भयंकर नाहीत. त्यापेक्षा कमी ताकदीचे आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. परंतु निष्काळजी सुध्दा राहू नये. या स्थितीत प्रत्येकाने योग्य दक्षता बाळगणे आवश्यक आहे, असा सावधानतेचा ईशारा पुण्यातील प्रसिध्द चेस्ट स्पेशालिस्ट डाॅ. राजीव आडकर यांनी नुकताच दिला आहे.
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या सर्दी- ताप- खोकल्याच्या आजाराबाबत लोकांमध्ये पसरलेली भीती बघता या आजाराचे व त्यातून उद्भवलेल्या परिस्थीतीचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी डाॅ. आडकर यांची भेट घेतली असता सविस्तर चर्चा करताना ते बोलत होते.
याविषयी अधिक माहिती देत, ते पुढे म्हणाले,
” कोविड काळात आपल्याला काही चांगल्या सवयी लागल्या होत्या. त्या पुन्हा पाळायला सुरूवात करायला हवी. बाहेरून आल्यावर हातपाय तोंड स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करावा. गरम पाण्याच्या गुळण्या, गरम पाणी पिणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, शक्यतो मास्कचा वापर करणे अशी काळजी घेतली तर सर्वसामान्य माणसाला भीतीचे कारण नाही. परंतु ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि दमा असे आजार आहेत अशा व्यक्तींनी मात्र काळजी घ्यायला हवी. थोडाही त्रास जाणवला तर डाॅक्टरांकडे जावून वेळीच उपचार केलेले बरे. त्याच प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनीही याबाबत आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या माझ्याकडे येणा-या पेशंटमध्ये सुरवातीला नुसता अंगात कणकण, सर्दी-खोकला अशी लक्षणे आढळतात. इतकेच असेल तर तो नेहमीचा ताप म्हणता येईल. त्यासाठी लगेच ॲन्टीबायटीक्स घेणे आवश्यकता नाही. पॅराॅसिटिमाॅल, क्रोसिन अशा सौम्य गोळ्यांनी हा साथीचा ताप आटोक्यात येऊ शकतो. अर्थात त्या त्या पेशंटची प्रकृती, साथीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण, वय, पेशंटची इतर आजारांची ‘केस हिस्ट्री’ बघूनच औषध गोळ्या दिल्या जातात. म्हणून त्रास जाणवताच डाॅक्टरांकडे जाणे योग्य.
सद्यस्थितीबद्दल सांगायचे तर माझ्याकडे आलेल्या अशा पेशंटला पाच दिवसांच्या साध्या ट्रीटमेंट कोर्सने बरे वाटले आहे. तरीही थोडीफार लक्षणं पाच दिवसांनंतरही दिसली तरी घाबरण्यासारखे नाही. त्यासाठी हाॅस्पीटलमध्ये
ॲडमिट होणे किंवा सलाईन, इंजेक्शन यांची गरज तितकी नसते. तसं काही वाटले तर डाॅक्टर इतर चाचण्या करायला सांगतील व त्यानुसार निदान होऊन उपचार सुरू होतील. पण सर्वसामान्यपणे अशाप्रकारची वेळ 90 ते 95 टक्के लोकांवर अजुन तरी आलेली नाही.
या आजारात सध्या आपण घरीच काळजी घ्यायची आहे. यात डिहायड्रेशन झालेच तर पातळ आहार घेणे,सतत पाणी पिणे, थोडा मऊ आणि आळणी आहार दिवसातून पाच सहा वेळा थोडा थोडा घेत रहणे, असे उपाय करावेत. आहार कोणता व किती घेतो, यावर बरेच अवलंबून असल्याने आलं-लसूण, मसालेदार आणि तिखट तेलकट अन्न टाळावे. नाहीतर उलट्यांचा त्रास सुरू होतो आणि त्यामुळेच डीहायड्रेशन होवून सलाईनची वेळ येते.
हा व्हायरल फीवर करोनासारखा वाटत असला तरी लगेच तशी भीती नाही. कारण आता आलेले H2 n किंवा H3 n हे व्हायरस अगदी फार भयंकर नाहीत. परंतु ते प्रतिकार शक्ती कमी झालेल्यांवर मात्र हल्ला करतात.
यासाठी ॲन्टीबायोटीक्स औषधोपचार दिले जातात. ती औषधे डाॅक्टर कोणत्या स्थितीत देतात ते महत्वाचे आहे. शरीरात किती प्रमाणात व्हायरल ईन्फेक्शन आहे त्यानुसार डोस ठरतो.ॲन्टीव्हायरल
जाणवले तरी प्रथम पॅरासिटीमाॅल सारखी औषधं पुरेशी ठरतात. त्याने बरे वाटले नाही तरच ॲन्टीबायटीक्स दिले जातात. जर औषध गोळ्यांनी
*इन्फेक्शन कमी झाले नाही तर एक चेस्ट एक्स्रे आणि एक साधी ब्लडटेस्ट करावी*, त्याचा खर्च कमीत कमी असतो. पण त्यातून नक्की निदान होते आणि योग्य ती ट्रीटमेंट लगेच सुरू करता येते.
कोरोनाची भेसूर परिस्थिती अनुभवल्यानंतर लोकांचे घाबरणे स्वाभाविक आहे. पण हे नक्की की, सध्याचे इन्फेक्शन तेवढे भयावह नाही. एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे या आजाराची साथ लगेच वेगात पसरते आहे. असा एखादा जरी पेशंट शिंकला – खोकला तरी हवेतून त्याचा संसर्ग लगेच इतरांना होवू शकतो. म्हणून कोणत्याही प्रार्थना
स्थळी असलेल्या रांगा, जत्रा, यात्रा, शोभायात्रा, मोर्चे, संप यासाठी जी गर्दी जमते ती धोकादायक आहे. यातून साथ झपाट्याने वाढते हे लक्षात घेऊन अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.
या स्थितीत लहान मुलांनाही मास्क कंपरसरी द्यावेत. घरातील ज्येष्ठ व आजारी यांची काळजी घ्यावी. कोरोनाचे गंभीर परीणाम आपण भोगलेले असल्याने आता प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन डाॅक्टरांनी केले असून आता याबाबत लोकांमध्ये ब-यापैकी जागृती दिसते, असे आपले निरीक्षण डाॅ. राजीव आडकर यांनी चर्चेचा समारोप करताना नोंदवले.
amruta.khakurdikar@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles