नाट्यशारदा तितिक्षा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नाट्यशारदा तितिक्षा पुरस्कार वितरण सोहळा संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी

पुणे : श्री ऐंटरप्राईजेस आणि तितिक्षा इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य,नाट्य , सामाजिक कार्य आदी विविध क्षेत्रातील सुमारे ५१मान्यवरांना २०२३ चा तितिक्षा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

तसेच यानिमित्ताने निमंत्रितांचे राज्यस्तरीय विशेष काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्वागत आणि प्रास्ताविक तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापिका प्रिया प्रमोद दामले यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक लेखक श्री.अशोक इंदलकर , सोल्यूशनमाइंड चे सर्वेसर्वा श्री.सुजित दातार आदी मान्यवरांनी काव्यासंदर्भातले आपले विचार व्यक्त केले.

नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार *नटश्रेष्ठ स्वरुपकुमार* यांना *नाट्य शारदा तितिक्षा जीवनगौरव* ,
*ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भावकवी वि.ग.सातपुते यांना* *नाट्यशारदा तितिक्षा काव्य जीवनगौरव पुरस्कार* जाहीर झाला.तर सबकुछ मधुसूदन चे निर्माण कर्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना *तितिक्षा काव्यजीवनगौरव पुरस्कार*
-2023 प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा गुरुनानक दरबार कॅम्प संस्थेचे अध्यक्ष श्री.चरणजीतसिंह साहनी , ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे कला व सांस्कृतिक आघाडीचे सरचिटणीस श्री. शैलेश बडदे तसेच श्री.विकास राऊत , श्री.संजय महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रारंभी स्वाती दिवाण यांनी पोवाडा सादर केला.या निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणा-या कविता सादर करण्यात आल्या. विविध काव्यलेखन स्पर्धा तसेच उखाणे स्पर्धांमधील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले.

नाट्य शारदा तितिक्षा राजमाता पुरस्कार दिपीकाजी कटरे यांना ,
नाट्यदिग्दर्शक सतीश इंदापूरकर यांना नाट्यशारदा तितिक्षा नाट्य शिक्षणमाता पुरस्कार , ज्येष्ठ कवयित्री मंदाताई नाईक यांना नाट्यशारदा तितिक्षा समाजमाता पुरस्कार, सौ.मनीषा सोनी- कुलकर्णी यांना तितिक्षा समाजमाता ,तर तितिक्षा राजमाता सौ.सुवर्णा जाधव आणि श्री.इंगळकर यांना
सन्मानित करण्यात आले.
सागरात वाघमारे, प्रा.दिलीप वाघमारे, राजश्री मराठे, प्रतिमा काळे, योगिता कोठेकर, विजय माने, श्रीशैल्य सुतार ,अमिताभ आर्य , कु.रेणुका गोल्हार ॲड.उमाकांतआदमाने ,आणि योगेश हरणे आदिंनी काव्यसंमेलन गाजवले.

आगामी काळात संस्थेतर्फे खास नवोदितांसाठी कोल्हापूर आणि शेगाव येथे राज्यस्तरीय एक दिवसीय काव्यसंमेलन आयोजित
करण्यात येणार आहेत , तसेच लवकरच काव्य वादळ निर्माण होऊन तितिक्षा इंटरनॅशनल संस्था प्रत्येक सभासदाचा पोर्टफोलिओ आणि
नवोदितांची वेबसाईट तयार करणार असल्याचे सोल्यूशनमाइंड चे श्री.सुजित दातार यांनी जाहिर केले. सौ.सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केलेला हा सोहळा संपन्न झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles