
निवृत्त सैनिक सहाय्यक आरोग्य योजना
नवी दिल्ली: निवृत्त सैनिक सहाय्यक आरोग्य योजना 2003 एप्रिलमध्ये लागू केली गेली आहे. निवृत्त सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. भारतात या योजनेखाली 30 स्थानिक केंद्रे, 433 पॉली क्लीनिक आहेत. यामध्ये 3,158 वैद्यकीय सेवा पॅनेल आहेत आणि नेपाळमधील सहा केंद्रे आहेत. याचा लाभ 55 लाख जणांना मिळतो. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेनुसार याचा आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेप्रमाणेच आणि दरांनुसार कॅशलेस आणि कॅप्लेस आरोग्य सेवा पुरवता येत आहेत.
संरक्षक खात्याचे लेखा परीक्षक नियंत्रकांकडून निवृत्ती वेतन येणारे सर्व निवृत्त सैनिक या योजनेला पात्र आहेत. त्यामध्ये अपंगत्व आलेले, कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि अवलंबून असणारे हे सुद्धा सभासदस्यत्वाला पात्र आहेत.
एक एप्रिल 2003 किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे आणि आधी निवृत्त झालेल्यांना सदस्यत्व घेणे ऐच्छिक आहे.
काही वर्षापासून निवृत्त सैनिक आरोग्य सेवेचे लाभ प्रादेशिक सैन्य (TA), संरक्षण सुरक्षा कॉर्प्स (DSC), भारतीय तटरक्षक दल (ICG), लष्करी परिचारक सेवा (MNS), विशेष फ्रंटियर फोर्स (SFF), नेपाळ निवासी यां संस्थांमधील निवृत्ती वेतनधारकांपर्यंत तसेच गोरखा (NDG), पूर्णवेळ राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी, पात्र लष्करी टपाल सेवा (APS) निवृत्तीवेतनधारक, आसाम रायफल्स पेन्शनधारक, दुसरे महायुद्ध मध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ, शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी (SSCOs), आपत्कालीन आयोग अधिकारी (ECOs) आणि निवृत्ती वयाआधी सेवानिवृत्ती घेतलेले यांच्या पर्यंतही नेण्यात आले आहेत.