क्षमा

क्षमा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘क्षमा’ दोन अक्षरी शब्द आहे. लहान शब्द पण, या शब्दानेच मानव महान होतो.
क्ष..क्षमाशील व्यक्तीमत्व
मा…मायेप्रमाणे माया करणारा
क्षमा करणारा फार महान असतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीने रागावून बोलले, तरी आपल्याला राग येतो. पण हा राग न दाखवता, त्याला क्षमा करून आपण त्याचे चांगले मित्र बनलो तर त्याचा राग विरघळेल. एखाद्याने शिव्या दिल्या म्हणून, आपण तशाच शिव्या दिल्या तर त्यात आणि आपल्यात फरक काय? त्याला आपण म्हणायचे या शिव्या मला नको आहेत. त्या तुझ्याजवळच ठेव. बघा बर काय होईल?..माहीत आहे मला आपण काही गौतम बुद्ध नाही. पण जर या आपल्या वर्तनातून समोरचा सुधारला, तर चांगलेच आहे न. त्याला क्षमा करायची पुढे चालायचे.

पाण्याबाहेर आलेल्या विंचवाला पाण्यात सोडले, त्याचा जीव वाचवला तरी, तो हाताला नांगी मारायचे राहत नाही. जर आपण त्याला पाण्याबाहेरच ठेवले व त्याचा जीव गेला तर तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला.क्षमा हा मानवाचा अत्यंत उत्तम गुणधर्म आहे .तो सर्वांनी
आपलेसे करावा म्हणजे आपल्याला होणारा बराचसा त्रास कमी होईल. आपण काही संत महात्मे नाहीत. प्रत्येक गोष्टीतच क्षमा करायला, पण, तरी या गुणाला आपलेसे केले तर जीवनातील अशांतता जावून शांतीचा आनंद नक्कीच उपभोगता येईल. एकूण काय तर चुकलं तर क्षमा करून मोठ्या मनाने त्यांची चूक पोटात घालावी. पण स्वतःच्या कृतीतून त्यांना ती चूक सुधारण्याची संधी द्यावी. म्हणजे आपल्यातले चांगले गुण आहेत ते इतरांना वाटण्याचा प्रयत्न करावा. स्वभाव हा नेहमी क्षमाक्षिल हवा असतो.

अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. आपण केलेल्या चुकीवर आई पांघरूण घालते. पण क्षमा करत नाही. ती चूक सुधारून घेते. कारण समाजामध्ये तुम्हाला जर वावरायचे असते. चांगले, वाईट याचा बोध घ्यायचा असतो. लहान मुलाच्या चुकीला क्षमा केली तर, तो सुकावेल , म्हणून बऱ्याचदा आईने चुकीवर पांघरून घालण्याऐवजी त्याची चूक त्याला समजून देणे गरजेचे आहे. चुकीला क्षमा करून ती चूक परत होणार नाही. हे मुलांकडून वदवून घ्यावे लागते. चला तर मग ‘क्षमा’ हा गुण आपण आपल्यात आणू या व जीवनाचा आनंद उपभोगूया.

आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा
ओठातूनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने
दुसर्‍यास मधूगंध द्यावा….

वसुधा नाईक,पुणे
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles