
शांतीचा मार्ग
नकारात्मक विचार अन्
नको प्रसार अशांतीचा
अवलंबूया सारे आपण
सन्मार्ग हा शांतीचा ||१||
सद्बुद्ध गौतमांच्या
शिकवणी अनमोल
सन्मार्ग अहिंसेचा
पहा किती बहुमोल ||२||
शांतीच्या मार्गावरती
आपण सारे चालूया
नव्या दृष्टिकोनातून
जग नवीन पाहूया ||३||
वादविवाद करता
नका उगाचच राहू
मनास प्रसन्न ठेऊ
जीवन परस्परांना वाहू ||४||
भेदभाव करता होई
अशांततेचा जागर
क्षणार्धात का पडावा
आम्हास शांतीचा विसर ||५||
मार्ग शांतीचा खरा
सर्वांनी अवलंबूया
गुण्यागोविंदाने सारे
चला एकत्र राहूया ||६||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
=======