नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमानुसार बदलीची मागणी

नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमानुसार बदलीची मागणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_माजी नगर सेवक साकीब शहा_

तालुका प्रतिनिधी पुसद

पुसद: येथील नगर परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची शासकीय नियमाप्रमाणे त्वरित बदली करण्याची मागणी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालककाकडे माजी नगरसेवक साकीब शाह यांनी दि. २७ मार्च २०२३ रोजी केली आहे. नियमानुसार बदली न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील तक्रारीतून दिला आहे.

पुसद नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख नगर अभियंता गिरीश डूबेवार हे दि.२९ जून २०१८ पासून एकाच पदावर कार्यरत आहेत.पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान जलदाय विभाग प्रमुख भूषण चव्हाण हे दि.१३ जुलै २०१७ पासून कार्यरत आहेत.तसेच स्थापत्य अभियंता अक्षय राठोड हे दि.१४ डिसेंबर २०१८ पासून एकाच पदावर रुजू आहेत. लेखाप्रमुख अशोक सरकुंडे हे दि.२२ जानेवारी २०१९ पासून नगरपालिकेमध्ये लेखा विभागात काम करत आहेत.आरोग्य विभागातील विभाग प्रमुख धीरज जाधव हे दि.२२ जानेवारी २०२१ पासून एकाच पदावर कार्यरत आहेत. कर विभागातील विभाग प्रमुख हरिश्चंद्र जाधव हे दि.२२ जानेवारी २०१९ पासून रुजू आहेत.अग्निशामक विभाग प्रमुख संतोष तेलंगे हे देखील दि.११ ऑगस्ट २०२१ पासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहे. जन्म मृत्यू विभागातील विभाग प्रमुख प्रशांत देशमुख हे दि.१ फेब्रुवारी १९९२ पासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे तसे न झाल्यास स लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

*अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून टेंडर मॅनेज*

नगर परिषदेमधी अधिकारी, कर्मचारी हे अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने त्यांनी ठेकेदार, नागरिकासह व्यापारी,पुरवठादार यांच्यासोबत सलोख्याचे संबंध निर्माण केले आहे.बांधकाम विभागाचे अभियंता व इतर कर्मचारी हे संबंधित ठेकेदाराशी संगणमत करून कोट्यावधी रुपयाची टेंडर देखील मॅनेज करत असल्याचा दावा केला आहे. अनेक वेळा असे टेंडर मॅनेज झाल्याचाही आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.एकाच ठिकाणी ठाण मानून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांची संपत्ती देखील गोळा केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असून देखील स्थानिकच्या नेते,पुढाऱ्यांशी हात मिळून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप देखील तक्रारीत केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles