
अभिमान मराठीचा
तूच हसवितेस , तूच रडवितेस
भावभावनांच्या राजधानीतही गडे
बोटही धरुन तूच चालवितेस…..
सांग गं कोण ही माझी सखी ?
दुसरीतिसरी कोण असेल ……
आहे बरं का मायमराठी माझी
बोबडे शब्द म् म् काढले तुझेच
प्रियतमेच्या भाळी चुंबन लाविले
अन् प्रीत झंकारत गेली तेव्हा…
प्रीततराणेही गायले मराठीचेच
सहचराची सोबत रम्य भासली
तुझ्याच रुपे नाव-उखाणे घेऊन
बाळराजा आला अंगणी जेव्हा
इथं इथं बैस रे मोरा वदवले….
तुझ्याच रम्य गोड वाणीतून….
आज आली वेळ तुझ्या कौतुकाची
लेखणीही माझी जरा सरसावते
तुझ्याच कृपाप्रसादे अंतरातून
मी अभिमान मराठीचा बाळगते
*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर , चंद्रपूर*
*लेखिका/कवयित्री*
*सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
©मराठीचे शिलेदार समूह