
नवविवाहितेवर सासरकडून जादूटोणा करण्याचा प्रयत्न
_लग्नात हुंडा देऊनही हुंड्यासाठी तगादा_
तालुका प्रतिनिधी, पुसद
पुसद: शहरातील तुकाराम बापू वार्डात राहणाऱ्या नवविवाहितेच्या माहेरी येऊन सासरच्या मंडळींनी जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप लावला आहे.नवविवाहितेला हुंड्यासाठी मारहाण करीत अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी सासरकडील मंडळीकडून मिळाली आहे.
घाबरलेल्या नवविवाहितेच्या वडीलाने वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून सासरच्या सहा मंडळी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून दि.२८ मार्च २०२३ रोजीच्या रात्री ८.२१ वाजता विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तुकाराम बापू वार्डात राहणाऱ्या नवविवाहित महिलेच्या वडीलाने दिलेल्या तक्रारीवरून मधुकर नगर येथे राहणाऱ्या शेख सकलैन शेख हसन वय २६ वर्षे सासरा शेख हसन वय ५२ वर्षे,सासू शाहिस्ता परवीन वय ४८ वर्षे,दिर शेख शोएब शेख हसन वय २४ वर्षे,शेख इंजमाम शेख हसन वय २२ वर्षे,ननंद सादीया खानम शेख हसन वय ३० वर्षे याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार येथील विश्वनाथ हिंदी हायस्कूलमध्ये शेख सकलेन सोबत तुकाराम बापू वार्डात राहणाऱ्या मुलीचा दि.२६ ऑक्टोंबर २०२२ रोजी मुस्लिम रिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. लग्ना वेळेस सासर कडील मंडळीला ३१ हजार रुपये नगदी, पाच ग्राम सोन्याची अंगठी नवरदेवाला दिली होती. त्यासोबतच लग्नामध्ये माहेरच्या मंडळींनी दोन लाख रुपयांच्या गृहपयोगी वस्तू दिल्या होत्या.तर नवरीच्या अंगावर दीड तोळ्याचा सोन्याचा हार,चार ग्रॅम सोन्याचे कानातली रिंग,पाच ग्रॅम सोन्याच्या अंगठीसह चांदीचे दागिने अंगावर परिधान केले होते.
लग्नाला जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च केला होता. एवढे करूनही पतीकडून तू मला पसंत नाही, मला तुझी आवश्यकता नाही,माझ्या जवळ तुझ्या सारख्या खुप महिला आहे, असे म्हणुन त्रास मिळत होता. सोबतच विवाहितेला माहेरी गेल्यावर काही ना काहीतरी घेऊन ये असा तगादा नेहमी लावत होते.माहेरून काही न आणल्याने तिला सासरकडील मंडळीकडून मानसिक,शारीरिक त्रास देत शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याची तक्रार वसंत नगर पोलीस स्टेशनला दिली असुन प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.