
अहमदाबादचे नाव बदलण्याची मनसे आमदाराची मागणी
_बदलाबदलीत मनसेची हनुमान उडी_
अहमदाबाद: राज्यात सुरु असलेल्या नामांतराच्या वादात आता राज ठाकरे यांच्या मनसेने देखील उडी घतेली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनरसह अनेक शहरांच्या नामांतराचा मुद्दा पेटला आहे. त्यातच आता मनसेच्या एकमेव आमदाराने थेट गुजरातमधील अहमदाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी अहमदाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.
*काय मागणी आहे राजू पाटील यांची?*
अहमदाबाद हे गुजरातमधील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. यामुळेच अहमदाबादचंही नामांतर करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. औरंगाबादचं नामांतर होऊ शकतं तर अहमदाबादचं का नाही ? असा सवालच राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अहमदाबादचे नाव सावरकर नगर करा
मनसे आमदरा राजू पटील यांनी अहमदाबादचे नाव बदलण्याची मागणी केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अहमदाबादचे नाव बदलून सावरकर नगर ठेवावे असं सुषमा अंधारे म्हणाल्या. गुजरात राज्यात केंद्रात त्यांचीत सत्ता आहे. यामुळे ते सहज अहमदाबादचे नाव बदलून सावरकर नगर असे ठेवू शकतात असं अंधारे म्हणाल्या.
*भाजपची प्रतिक्रिया*
भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटींवार यांनी नामांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये काँग्रेस विरोधात आहे. यामुळे गुजरात काँग्रेसनं तशी मागणी करावी अशी भूमिका सुधीर मुनगंटींवार यांनी मांडली. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने उचलून धरला होता. मात्र, अहमदाबचे नाव बदलण्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे का? हे पहावे लागेल असं सुधीर मुनगंटींवार म्हणाले.