साक्षात्कार

साक्षात्कारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

साक्षात्कार नि चमत्काराचे आता फुटलंय कसे पेव?
खरंच सांगा अंधभक्तांनो दगडात असतो का देव?

तिजोरीवर घाव घालून फोडतात कसे चोर?
दानपेटी भरावी म्हणून कोण करतोय घोर?
टाकीचे घाव घालून देतो आपणच दगडाला देवपण
साक्षात्कार होईल देवाचा म्हणून बोलू नका कायपण

नवसे पुञ होती तर का करने लागे पती सांगती संत
पुञ होत नाही म्हणून कसा स्ञीयांचा करतात अंत
गणपती दुध पितो म्हणून झाला कसा साक्षात्कार?
भारत महासत्ता बनल्याचा घडेल का मग चमत्कार?

साक्षात्कार होतात आजही स्वप्नात येऊन सांगे देव
पापाचा घडा भरलेल्यांना धडा शिकविण्याचे भेव
माणसात देव शोधण्याचा गाडगेबाबांनी दिला सल्ला
देवधर्माच्या नावाखाली मारती दानपेटीवर डल्ला

गुप्तधनाच्या हव्यासाने दिले जातात इथे नरबळी
वंशाच्या दिव्यासाठी कशी गर्भातच खुडतात कळी
साक्षात्कार घडला म्हणून बुवा,बापू घालतात थैमान
उमललेली कळी पाहता जागा होतो यांच्यात हैवान

म्हणूनच विचारावेसे वाटते

साक्षात्कार नि चमत्काराचे आता फुटलंय कसे पेव?
खरंच सांगा अंधभक्तांनो दगडात असतो का देव?

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️ मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles