
प्रा. कवाडे सर यांचा जन्मदिवस संघर्ष दिन साजरा
नागपूर प्रतिनिधी // रजत डेकाटे
नागपूर:- नागपूर येथील सीताबर्डी येथील मुख्य कार्यालयात लाॅग मार्च प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारतातील प्रथम म्हणजे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा जन्मदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी ढोल ताश्याच्या गजरात त्यांचे स्वागत केले. पक्ष कार्यालयात एकच आवाज गुंजत होता प्रा. कवाडे सर यांचा विजय असो,”सर कवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है. हमारा नेता कैसा हो सर कवाडे जैसा हो. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी पिरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या रंजना जोगेंद्र कवाडे, प्रतिमा जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेशचे चरणदास इंगोले, पिरिपाचे नेते दिलीप पाटील, कार्यालयीन सचिव भिमराव कळमकर, अजय चव्हाण,प्रणय हाडके शितल बोरकर, सुनिल मेश्राम,प्रफुल डांगे, रजत डेकाटे, कैलास बोंबले,राजेश ढेपे, नागपूर जिल्हा अध्यक्ष पिरिपाचे नरेंद्र डोंगरे,बाळु कोसमकर, विजय पाटील, सुचिता कोटांगले, प्रतिभा मानवटकर, नागपूर जिल्हा अध्यक्षा सविता नारनवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.