जंगली प्राण्याकडून तीन वर्षांच्या वासराची शिकार

जंगली प्राण्याकडून तीन वर्षांच्या वासराची शिकार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी, पुसद

पुसद: तालुक्यातील हिवाळी तलाव येथे वन्य प्राण्याने गोऱ्याची दि.२८ मार्च २०२३ रोजीच्या रात्री आठ वाजता दरम्यान शिकार केल्याची बाब उघडकीस आले आहे. वन्य प्राण्याने शिकार केल्यामुळे आर्थिक संकटात सापलेल्या ग्रामस्थाला शासनाकडून नियमानुसार मदत देण्याची मागणी पत्राद्वारे दि.२९ मार्च २०२३ रोजी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला दिले आहेत.

युवराज बक्षीराम चव्हाण रा. हिवाळी(त) यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला वन्य प्राण्यांने शिकार केल्याची बाब उघडकीस आणून दिली आहे. युवराज चव्हाण यांचे तीन वर्षाचे गोरे नेहमीप्रमाणे सकाळी परिसरातील जंगलामध्ये चरण्यासाठी गेला होता. संध्याकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान नेहमी घरी येत होता.परंतु दि.२८ मार्च २०२३ रोजी नेहमीप्रमाणे चरण्यासाठी तीन वर्षाचा गोरा गेला असता घरी परतलाच नाही.

त्यानंतर युवराज चव्हाण यांनी परिसरात शोध घेतला असता कुठेही आढळून आलेला नाही.अशावेळी परिसरातच एका कांबळे नावाच्या व्यक्तीने नालीजवळ शिकार झालेले गोरा असल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळ आठ वाजताच्या दरम्यान गाठले असता वन्य प्राण्याने शिकार करून ठार मारल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दि.२९ मार्च २०२३ रोजी शिकार केली असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles