
देवा, आभार तुझे
चौऱ्यांशी योनीचा हा
फेरा सार्थकी लागला
देवा , आभार तुझे
जगी मनुष्यदेह लाभला…
त्याग,वात्सल्यमूर्ती आई
वडील आभाळाचा आधार
यांच्या पोटी जन्मास आले
देवा मानू तरी किती आभार..
संघर्षपूर्ण जीवनात नेहमी
प्रेम,आदर,कर्त्यव्य जाणणारा
असा सुयोग्य पती मिळाला
पत्नीधर्मही नितांत मानणारा
जिच्या जन्माने माझ्या
मातृत्वास आला अर्थ खरा
अशी कन्यारूपी लक्ष्मीच
लेकीच्या रूपाने आली घरा
सुखी संसारात रमतांनाही
परमार्थाचा ना विसर पडावा
भक्तिमार्गाची ओढ लागो
गुरूकृपेचाही योग घडावा..
धन्य झाले मी ह्या जन्मी
कर्ममुक्त अवस्था लाभू दे
देवा ,शेवटी इतुकेच दान दे
जीवन संध्या मोक्षमार्गी निघू दे…!
संध्या मनोज पाटील अंकलेश्वर
======