
श्रीराम जन्मोत्सव
चैत्र शुद्ध प्रतिपदा
पवित्र मास असे तिथी
कौशल्याचा पुत्र राम
रघुनंदन येती अतिथी
स्वये विष्णू अवतार राम
मर्यादा पुरुष श्रद्धास्थान
उद्धार तो केला रामानुजन
हनुमंत भक्त मनी अधिष्ठान
श्रीराम नवमी अध्यात्मिक
गुरुपुषामृत सिद्धी लाभ
चैत्रशुद्ध नवमी तिथीला
श्रीराम प्रभू चा जन्म लाभ
राम नाम घेता श्रीरामाचे
संकट दुःख भय दूर जाती
मोक्षप्राप्ती होते मनाची
जीवनात आनंद मिळती
एक पत्नी एक वाणी राम
माता पित्यांच्या सेवेत सज्ज
पतिवृत्त सीतेसाठी रावण युद्ध
असे हे आदर्श रामराज्य
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
======