
तैलचित्र
होतो कधी प्रिया तुझा, कधी जीवलग मित्र
उरलो तुझ्या स्मृतीत, आता बनूनी तैलचित्र.. //
कधी हळव्या भावनाही, जपल्या अहो रात्र
आज निघताना खपल्या, जीव गलित गात्र.. //
वळले तुझे पाऊल, नसे खंत खेद अणूमात्र
कळले मला इतके, मीच नसेन तुजला पात्र.. //
काळजावर कोरलेय, तू मला लिहिलेले पत्र
सांग विसरू तरी कसा मी, ते मंतरलेले सत्र.. //
आजही मुखात माझ्या, हा तुझाच नाम मंत्र
छबी तुझी न्याहाळन्यास, हे आतूर माझे नेत्र.. //
हे जगावेगळे नातेसंबंध,गूढ गहन प्रीतशास्त्र
समजून उमजून घेण्या, सरतील जन्म सहस्त्र.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
=========